ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी ः देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे
प्रत्येकाची जबाबदारी ः देशमुख
ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी ः देशमुख

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी ः देशमुख

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : ज्येष्ठ नागरिकांची योग्य ती काळजी घेणे, हे त्या कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन व्याख्याते अशोक देशमुख यांनी व्यक्त केले.
पुण्यातील समता सहकारी पतसंस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आनंदी जीवन कसे जगावे’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. देशमुख म्हणाले, ‘ज्येष्ठ नागरिकांनीही आपले आयुष्य कुटुंबासमवेत आनंदाने, सुखाने जगावे. त्यासाठी बोलणे, चालणे, हसणे, दानधर्म, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणे, माफ करणे, योगसाधना या सवयी अंगीकाराव्यात. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचे आयुष्य हे आनंदात आणि सुखात जाईल.’
समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे म्हणाले की, समता पतसंस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फायदेशीर योजना सुरू केल्या आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर अर्धा टक्का व्याज अधिक देणार आहे. या वेळी ज्येष्ठ सभासद सुभाष राजवळ, शेख जी.जी. आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डेक्कन जिमखाना भागातील अथर्व हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमास श्रीनिवास पिंपळवाडकर, ईश्वर आंधळकर, रमेश आंधळकर, दिलीप देशमुख, दिलीप साखरे, रत्नाकर म्हाळगी, कैलास गंगवाल आदींसह विविध क्षेत्रातील ज्येष्ठ सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सचिन भट्टड, पुणे शाखेचे शाखाधिकारी राजेश महाजन आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संजय पारखे यांनी सूत्रसंचालन केले.