‘प्लेसमेंट सेलसाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमावेत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्लेसमेंट सेलसाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमावेत’
‘प्लेसमेंट सेलसाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमावेत’

‘प्लेसमेंट सेलसाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमावेत’

sakal_logo
By

पुणे, ता. १४ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्लेसमेंट सेलचे काम सध्या फक्त एक कर्मचारी पाहत आहे. एकूण चार कर्मचाऱ्यांची गरज असताना एकाच कर्मचाऱ्यावर मदार असून, विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या दृष्टीने सेलसाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमावेत, अशी मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे. या संबंधीचे पत्रही त्यांनी कुलसचिवांना दिले आहे.
दलाचे पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे सांगतात, ‘‘सेलला एकूण चार कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु वेळेवर पगार होत नसल्याने एक महिन्यापूर्वी प्लेसमेंट समन्वय अधिकाऱ्याने काम सोडले आहे. आठ दिवसांपूर्वी आणखी एका अधिकाऱ्याने काम सोडले आहे. त्यामुळे पूर्ण प्लेसमेंट सेलचा कारभार एक कर्मचारी पाहत आहे. विद्यापीठात एकूण वेगवेगळे ५७ विभाग आहे. विद्यापीठ कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना जॉबसाठी अनेक कंपन्यांकडून मागणी आहे. परंतु कंपनी व प्लेसमेंट सेलला सक्षम समन्वय अधिकारी नाही.’’ निष्क्रीय प्लेसमेंटसेलमुळे विद्यार्थ्याच्या करियरवर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांना नोकरीची नितांत गरज असताना प्लेसमेंट सेल बंद अवस्थेत असल्याचा आरोप युक्रांदने केला आहे. कुलसचिवांसोबत चर्चा करताना युक्रांदचे कुशल चव्हाण, मयूर शिंदे उपस्थित होते.