लष्कर दिनाच्या संचलनात ‘बीईजी’ही घेणार सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लष्कर दिनाच्या संचलनात ‘बीईजी’ही घेणार सहभाग
लष्कर दिनाच्या संचलनात ‘बीईजी’ही घेणार सहभाग

लष्कर दिनाच्या संचलनात ‘बीईजी’ही घेणार सहभाग

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना यंदा भारतीय लष्कराचाही ७५ वा ‘लष्कर दिन’ साजरा होत आहे. प्रथमच लष्कर दिनाचा हा सोहळा दिल्लीच्या बाहेर होत आहे. या वर्षी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला सोहळ्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यानिमित्त बंगळूर येथे होणाऱ्या संचलनात पुण्यातील खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटरच्या (बीईजी) तुकडीचाही सहभाग राहणार आहे.
दिल्लीबाहेर प्रमुख कार्यक्रम आयोजित करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाच्या अनुषंगाने १५ जानेवारी रोजी होणारी ‘आर्मी डे परेड’ दक्षिण मुख्यालयाद्वारे बंगळूरमध्ये आयोजित केली आहे. यंदाचे नियोजन दक्षिण मुख्यालयाकडे असून मुख्यालयाचे प्रमुख कार्यालय पुण्यात असले तरी दक्षिण मुख्यालयांतर्गत येणाऱ्या संपूर्ण भागात बंगळूर हे मध्य ठिकाणी असल्यामुळे हा सोहळा तेथे होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लष्कर दिनाच्या संचलनात सहभागी लष्करी तुकड्या ः
- एमईजी अँड सेंटर
- पॅरा रेजमेंट सेंटर
- बीईजी अँड सेंटर
- महार रेजमेंट सेंटर
- तोफखाना केंद्र (हैदराबाद व नाशिक)

महिनाभर आयोजित उपक्रम ः
- शिबिरातून ७५ हजार दात्यांचे रक्त संकलन
- दक्षिण मुख्यालयांतर्गत ७५ ठिकाणी स्वच्छता मोहीम
- अमृत सरोवर मोहीम
- ७५ हजार वृक्षांचे रोपण