पुणे स्थानकावर आतंकवादी हल्याचा कॉल प्रवाशासोबत भांडण झाल्याच्या रागात केला फोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे स्थानकावर 
आतंकवादी हल्याचा कॉल 

प्रवाशासोबत भांडण झाल्याच्या रागात केला फोन
पुणे स्थानकावर आतंकवादी हल्याचा कॉल प्रवाशासोबत भांडण झाल्याच्या रागात केला फोन

पुणे स्थानकावर आतंकवादी हल्याचा कॉल प्रवाशासोबत भांडण झाल्याच्या रागात केला फोन

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः नांदेड-पुणे एक्स्प्रेस ने पुण्याला येणाऱ्या प्रवाशाचे डब्यातील अन्य प्रवाशासोबत भांडण झाले. रागात पोलिसांना धडा शिकविण्याच्या उद्देशाने रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करून पुणे स्थानकांवर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आतंकवादी हल्ला होणार आहे. तसेच कामशेत-मळवली दरम्यानचे रेल्वे मार्ग देखील उडविले जाणार असल्याचे सांगितले. शहर पोलिसांनी याची माहिती देताच लोहमार्ग पोलिस व आरपीएफ यांनी पुणे स्थानक पिंजून काढला. सकाळी १० वाजता त्याला ताब्यात घेतल्यानंतर रागात केलेला कॉल असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

गोविंद भगवान मांडे (वय ३८, रा, शिवशंभो नगर, गल्ली क्रमांक १,कात्रज-कोंढवा रोड, पुणे) हा व्यक्ती नांदेड-पुणे एक्स्प्रेसने प्रवास करीत पुण्याला येत होता. मनमाड स्थानक गेल्यावर डब्यातील एका प्रवाशांसोबत जागेवरून वाद झाला. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या व्यक्तीने मी पोलिस असल्याचे सांगितले. तेव्हा त्याचा राग मनात धरून गोविंद मांडे यांनी पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून सकाळी ९ वाजता पुणे स्थानकावर आतंकवादी हल्ला होणार असल्याचे सांगितले. शहरांत जी २० ची आंतरराष्ट्रीय परिषद, शिवाय २६ जानेवारीचा अलर्ट असल्याने आरपीएफ व पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले. दोघांनी मळवलीपासून ट्रक तपासात पुण्याच्या दिशेने आले. रात्री साडे बाराच्या सुमारास सुरू झालेला तपास सकाळी ९ पर्यंत सुरूच होता. दरम्यान, पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशन वरून राहत्या घरातून शनिवारी सकाळी १० च्या सुमारास ताब्यात घेतला. त्यावेळी त्यांनी रागातून हा कॉल केला असल्याचे सांगितले.