मध्यवर्ती भागांच्या तुलनेत मतदारांची संख्या निर्णायकरित्या जास्त
पुणे, ता. १८ : नुकतीच प्रसिद्ध झालेली विधानसभा मतदारसंघांनुसार मतदारांची आकडेवारी पाहिली असता, उपनगरांतील मतदारसंख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. उलटपक्षी, मुख्य शहरातील मतदारसंघांमध्ये मात्र तितकीशी वाढ होताना दिसत नाही. असे होण्यामागची नेमकी कारणे काय आहेत, याचे संभाव्य परिमाण काय होऊ शकतात, याचा घेतलेला आढावा.
वाढीची कारणे
- मध्यवर्ती भागात जागा कमी प्रमाणात उपलब्ध; सदनिकांचे दरही गगनाला भिडलेले
- उपनगरांत मोकळी जागा जास्त प्रमाणात; सदनिकांच्या किमतीही तुलनेत कमी
- परिणामी, बाहेरगावांतून येऊन स्थायिक होणाऱ्या नागरिकांची उपनगरांना मोठी पसंती
- वाढत्या कुटुंबाचा विचार करता तसेच मध्यवस्तीतील नागरी समस्या लक्षात घेता, शहरातील मूळ रहिवाशांचाही उपनगरांत स्थायिक होण्याकडे कल
संभाव्य राजकीय परिणाम
- भविष्यात शहराच्या राजकारणात मध्यवर्ती भागाच्या तुलनेत उपनगरांचा दबदबा वाढणार
- महापालिकेत मध्यवर्ती भागापेक्षा उपनगरांतील नगरसेवकांची संख्या अधिक असणार
- विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतही येथील मतदारांचा प्रभाव राहणार
- पुणे शहराखेरीज बारामती आणि शिरूर या लोकसभा आणि पुरंदर, भोर आणि शिरूर या विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीतही उपनगरांतील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार
- शहराच्या संदर्भातील निर्णय, धोरणे ठरवितानाही उपनगरांतील रहिवाशांचा प्राधान्याने विचार करावा लागणार
- पुढील मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये मुख्य शहरातील मतदारसंघ कमी होऊन उपनगरांतील मतदारसंघांत होऊ शकते वाढ
महत्त्वाच्या नोंदी
- पुण्यात मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या मतदारसंघांपेक्षा उपनगरांतील वडगाव शेरी, खडकवासला, हडपसर येथील मतदारसंख्या निर्णायकरित्या जास्त
- पिंपरी-चिंचवडमध्येही मूळ पिंपरी शहरापेक्षा चिंचवड आणि भोसरी यांच्या उपनगरांत मतदारसंख्येत मोठी वाढ
- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पुण्यातील उपनगरांचा समावेश असणाऱ्या पुरंदर, भोर आणि शिरूर या विधानसभांची मतदारसंख्या इतरांपेक्षा अधिक (महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे मोठ्या प्रमाणात याच मतदारसंघांतील)
शहराच्या मध्यवर्ती भागातील जागांचा व्यावसायिक कारणांसाठी वापर आणि रहिवासाची ठिकाणे उपनगरांत अशा पद्धतीने आपल्याकडे सध्या शहरे विकसित होत आहेत. तसेच, उपनगरांत तुलनेने कमी खर्चात उपलब्ध होणारी घरे हे देखील त्या ठिकाणी मतदारसंख्या वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे.
- संतोष दास्ताने, नागरीकरणाचे अभ्यासक
मतदारसंख्येनुसार मतदारसंघांची विभागणी
पाच लाखांपेक्षा जास्त
चिंचवड
हडपसर
भोसरी
खडकवासला
चार ते पाच लाख या दरम्यान
वडगाव शेरी
शिरूर
पुरंदर
तीन ते चार लाख या दरम्यान
भोर
कोथरूड
मावळ
बारामती
पिंपरी
खेड-आळंदी
पर्वती
इंदापूर
जुन्नर
दौंड
तीन लाखांपेक्षा कमी
आंबेगाव
कसबा पेठ
शिवाजीनगर
पुणे कॅन्टोन्मेंट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.