विद्वत संमेलनाचे आज आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्वत संमेलनाचे आज आयोजन
विद्वत संमेलनाचे आज आयोजन

विद्वत संमेलनाचे आज आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र प्रदेशच्या सामाजिक समरसता विभागातर्फे रविवारी (ता. २२) ‘विद्वत संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. ‘शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे’चे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांच्या हस्ते सकाळी १० वाजता स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी परिषदेचे अखिल भारतीय समरसता प्रमुख देवजीभाई रावत यांचे बीजभाषण होणार असून परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष पांडुरंग राऊत उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात ‘भारतीय संविधान व संत साहित्याचा अंतरंग संबंध’, ‘भारतीय संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्य’, ‘भारतीय संविधान आणि सामाजिक समरसता’ आदी विषयांवर विचारमंथन होणार आहे.