नवरात्रोउत्सवानिमित्त 
‘आदर्श माता पुरस्कार’ जाहीर

नवरात्रोउत्सवानिमित्त ‘आदर्श माता पुरस्कार’ जाहीर

पुणे, ता. १३ ः कात्रज येथील श्री भवानी माताजी जैन मंदिर ट्रस्टतर्फे नवरात्रो उत्सवानिमित्त ‘आदर्श माता पुरस्कार’ सोहळा होणार आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती ट्रस्‍टचे संस्थापक अध्यक्ष राजेश नाहर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष रसिकलाल नाहर, संपतराज नाहर, अभय नाहर, उपाध्यक्ष सुभाष नाहर आदी उपस्थित होते.

सुभाष नाहर म्हणाले, ‘‘या ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम होतात. पुरस्कार सोहळ्यात जया नाहर आणि चित्रा नाहर यांना ‘आदर्श माता पुरस्कार’ दिला जाणार आहे. तसेच चक्रासन आणि टो जम्प या प्रकारात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केल्यामुळे हृदय चिंतन नाहर याचा विशेष सन्मान करणार आहे. हा कार्यक्रम येत्या रविवारी (ता. १५) दुपारी साडेतीन वाजता कात्रज भिलारेवाडी येथील भवानी माता मंदिरात होणार आहे. या कार्यक्रमाला महिला जैन संघटनेच्या प्रमुख राजश्री पारख व उद्योजक मनोज छाजेड उपस्थित राहणार आहेत.’’

यावेळी ट्रस्टच्या वतीने भाविकांना वापरात न येणारे जुने कपडे, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पादत्राणे, बॅग्ज, पर्सेस, खेळणी, भांडी मंदिरात द्यावी, असे आवाहन केले आहे. या वस्तूंची दुरुस्ती करून गरजूंना पुनर्वापरासाठी दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com