१४ ऑक्टोबर २०२३

१४ ऑक्टोबर २०२३

आज पुण्यात
..................................
शनिवार, १४ ऑक्टोबर २०२३
..................................
सकाळी ः
पुस्तक प्रकाशन ः ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन आयोजित ः गौतम कोतवाल लिखित ‘रिअल अचिव्हर्स’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- दीपक शहा, शेखर मुंदडा, राजेंद्र पवार, गौतम कोतवाल ः पुरस्कारार्थी- संजय दिवेकर, सिद्धांत यादव, मनीषा लोहकरे, दिनेश भागवत ः पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः १०.००.

परिसंवाद ः महाराष्ट्र साहित्य परिषद, गरवारे महाविद्यालय मराठी विभाग, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे ः वाचनप्रेरणा दिनानिमित्त परिसंवाद ः विषय- आम्ही काय वाचतो आणि का वाचतो? ः अध्यक्ष- डॉ. विलास उगले ः प्रमुख पाहुणे- मिलिंद जोशी ः उपस्थिती- सुनीताराजे पवार, डॉ. वर्षा तोडमल ः सहभाग- अस्मिता मराठे, साक्षी कड, सुशील गव्हाणे, अक्षय मोरे ः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, कर्वे रस्ता ः १०.३०.

दुपारी ः
काव्यसंग्रह प्रकाशन ः वल्लरी प्रकाशनतर्फे ः ‘मधुमालती’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि जीवनगौरव पुरस्कार : पुरस्कारार्थी- मुकुंदराव गोरे ः अध्यक्ष- उमाकांत दांगट ः प्रमुख पाहुणे- म. भा. चव्हाण, बबन पोतदार,
कीर्ती मुळीक, शरद कुबेर ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः सायंकाळी ४.

पारितोषिक वितरण ः केसरी आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ः कै. न. चिं. केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक समारंभ ः पुरस्कारार्थी- माधव गाडगीळ ः टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुकुंदनगर ः ४.००.

सायंकाळी ः
व्याख्यान ः दि पूना लॉज थिओसोफिकल सोसायटी आयोजित ः विषय- सनातन धर्म आणि आजचा समाज (उत्तरार्ध) वक्ते- भास्कर तेंडुलकर ः दि पूना लॉज थिओसोफिकल सोसायटीचे सभागृह, बीएमसीसी रस्ता ः ५.००.

पुस्तक प्रकाशन ः डॉ. रामचंद्र देखणे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ः रामचंद्र देखणे लिखित ‘लोककलेतील गण’ या पुस्तकाचे प्रकाशन ः उपस्थिती- डॉ. बाबा महाराज तराणेकर, चंद्रकांत पाटील, श्रीनिवास पाटील, डॉ. मदन महाराज गोसावी, मिलिंद जोशी ः ‘बहुरूपी भारूड’ हा साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम ः मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेजचे ऑडिटोरियम, शिवाजीनगर ः ५.३०.

पुरस्कार वितरण ः भारत इतिहास संशोधक मंडळ, तसेच मुजुमदार कुटुंबीयांतर्फे ः कै. गंगाधर नारायण ऊर्फ आबासाहेब मुजुमदार, स्मृती पुरस्कार वितरण ः पुरस्कारार्थी- डॉ. चंद्रकांत अभंग ः हस्ते- डॉ. गो. बं. देगलूरकर ः अध्यक्ष- प्रदीप रावत ः सरदार मुजुमदार वाडा, १८७, कसबा पेठ, शिवाजी रस्ता ः ५.३०.

सत्कार ः नाट्यशास्त्र, महाभारतावरील संशोधन आणि अनेक इंग्रजी आणि मराठी अनुवाद या क्षेत्रातील योगदानाबद्दल ः डॉ. सरोज देशपांडे यांचा सत्कार ः प्रमुख उपस्थिती- राजीव नाईक, डॉ. राजा दीक्षित, डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. रेखा इनामदार ः भांडारकर संस्थेचे फिरोदिया सभागृह, ः ६.००.

देवी नृत्य महोत्सव ः कलाछाया कलचर्ल सेंटर आयोजित ः देवी या विषयावर कथक, कुचीपुडी, ओडिसी, भरतनाट्यमम ः सादरकर्त्या- शर्मिला मुजुमदार आणि सहकारी ः सहभागी कलाकार- गौरी शुक्ला, तन्मयी पाटील, रेणुका टिकारे व अन्य ः कलाछाया कल्चर्स सेंटर, विखे-पाटील शाळेसमोर, पत्रकारनगर ः ६.३०.

उद्‍घाटन सोहळा ः पुणे नवरात्रौ महोत्सव अंतर्गत ः सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिराला नवरात्रीनिमित्त शिशमहालाचे रूप ः उद्‍घाटन हस्ते- श्री. संदीप कर्णिक ः श्री लक्ष्मीमाता मंदिर,
मुक्तांगण शाळेजवळ, वसंतराव बागूल उद्यानानजीक, सहकारनगर ः ७.००.
.......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com