उंड्रीमधील अनधिकृत शेडवर कारवाई

उंड्रीमधील अनधिकृत शेडवर कारवाई

पुणे, ता. १३ ः महापालिकेच्या बांधकाम विभागाने उंड्री भागातील ७० अनधिकृत शेडवर कारवाई करून १५ हजार ७०० चौरस मीटरवरील अतिक्रमण पाडले.

उंड्री भागात खासगी जागेवर पत्र्याचे शेड मारून विविध प्रकारचे व्यवसाय केले जात होते. शहरात काही महिन्यांपासून अनधिकृत शेडला आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात अशा प्रकारच्या कारवाई सुरू आहेत. उंड्री भागात ७० शेडला नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार कारवाई करून १५ हजार ७०० चौरस मीटर जागेवरील अतिक्रमण काढले. उपअभियंता संदीप शिंदे, शाखा अभियंता भीमराव पवार, कनिष्ठ अभियंता अनुप गज्जलवार यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com