घोरपडीत ‘वंदे भारत’चा कोचिंग डेपो

घोरपडीत ‘वंदे भारत’चा कोचिंग डेपो

पुणे, ता. २६ ः घोरपडीत ‘वंदे भारत’ एक्स्प्रेससाठी कोचिंग डेपो बांधण्यासाठी अखेर रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. सुमारे ९० कोटी रुपये खर्चून हा डेपो उभारला जाणार आहे. यात पहिल्यांदाच छत असलेले पिटलाइन बांधण्यात येणार आहे. याच्या निविदा प्रक्रियेला देखील लवकरच सुरवात होणार आहे. घोरपडीचा कोचिंग डेपो हा मध्य रेल्वेतला दुसरा डेपो असणार आहे.
देशात सध्या विविध रेल्वे मार्गावर ३४ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. पुणे स्थानकावरून सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. मात्र, अद्याप एकही पुणे विभागाची वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झालेली नाही. वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्यासाठी कोचिंग डेपो बांधणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याच डेपोत वंदे भारतच्या डब्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. ‘वंदे भारत’च्या डब्याची रचना अन्य डब्याप्रमाणे नसल्याने याच्या सुरक्षेसाठी छत बनवली जात आहे. मध्य रेल्वेत केवळ असा डेपो मुंबई विभागात आहे. आता पुण्यात देखील बांधला जाणार असल्याचे याचा फायदा पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यासाठी होणार आहे. पुणे-सिकंदराबाद, पुणे-नागपूर व पुणे-अहमदाबाद आदी मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याची शक्यता आहे.

रेल्वे बोर्डाने घोरपडीत कोचिंग डेपोला मंजुरी दिली आहे. निविदा प्रक्रियेला लवकरच सुरवात होईल. सहा ते सात महिन्यांत डेपो बांधला जाईल. पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्यासाठी ही आवश्यक बाब आहे.
- डॉ. रामदास भिसे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे विभाग, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com