मार्च अखेर प्रलंबित 
अर्ज निकाली काढा

राज्य सरकारच्या ‘भूमिअभिलेख’ला सूचना

मार्च अखेर प्रलंबित अर्ज निकाली काढा राज्य सरकारच्या ‘भूमिअभिलेख’ला सूचना

पुणे, ता. ३ : जमीन मोजणीसाठी दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात भूमी अभिलेख विभागात अपुरे मनुष्यबळामुळे अर्ज प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे जमीन मोजणीचे अर्ज ३१ मार्च २०२४ अखेर निकाली काढावेत, अशा सूचना राज्य शासनाने भूमि अभिलेख विभागाला दिल्या आहेत.

राज्यात वाढत्या नागरिकरणामुळे केंद्र व राज्याने विकासाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामुळे जमिनींना सोन्याचे भाव आले असून, जमिनीच्या मालकी हक्काबरोबरच हद्दीचे वाद वाढत आहेत. त्यामुळे मोजणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुणे विभागासह नाशिक, कोकण या विभागात मोजणीचे अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे, परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे लवकर अर्ज निकाली काढण्यास भूमी अभिलेख विभागाला शक्य होत नाही.

दाखल अर्जांचा निपटारा त्वरित व्हावा, यासाठी भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणीसाठी साधी मोजणी, तातडीची आणि अतितातडीचे मोजणी असे तीन प्रकार सुरू केले. साधी मोजणीला कमी पैसे, तातडीची व अतितातडीच्या मोजणीला जादा पैसे मोजावे लागतात. तातडीची व अतितातडीची मोजणी साधी मोजणीपेक्षा अधिक लवकर होते. मात्र, पुणे जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यात मोजणीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. कर्मचाऱ्यांची कमी संख्या आणि कमी रोव्हर मशिन यामुळे साधी मोजणीसाठी तीन ते सहा महिने, तातडीची व अतितातडीच्या मोजणीसाठी दीड ते दोन महिने लागत आहे. त्यातून प्रलंबित अर्जांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारने महसूल विभागाला महाराजस्व अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत. चार महिन्यांत अर्जांचा निपटारा करण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत.

पुणे विभागाची स्थिती
पुणे विभागामध्ये मार्च अखेर ३५ हजार ९०६ जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित होती. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ५६ हजार ६६० नव्याने जमीन मोजणीचे अर्ज दाखल झाले. परिणामी जमीन मोजणीसाठी एकूण ९२ हजार ५६६ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी आतापर्यंत ५४ हजार ९९६ प्रकरणे निकाली काढली आहेत. त्यामुळे नोव्हेंबर अखेर ३७ हजार ५७० मोजणीचे अर्ज प्रलंबित आहेत.
**

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com