गिरीप्रेमी संस्था उलगडणार
गिर्यारोहणाचा रोमांचक प्रवास

गिरीप्रेमी संस्था उलगडणार गिर्यारोहणाचा रोमांचक प्रवास

Published on

पुणे, ता. ८ ः आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या पूर्वसंध्येला गिरीप्रेमी संस्थेतर्फे माउंट मेरू आणि माउंट सुदर्शन या शिखरावरील गिर्यारोहणाचा रोमांचक प्रवास उलगडून दाखविणारे लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत, तसेच पर्वतीय परिसंस्था वाचविण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांचा आणि व्यक्तींचा सन्मानही या वेळी करण्यात येणार आहे.
रविवारी (ता. १०) सायंकाळी सहा वाजता शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या वेळी उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनिअरिंगचे प्राचार्य कर्नल अंशुमन भदोरिया व उपप्राचार्य मेजर देवल बाजपेयी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सर्वांसाठी खुला व मोफत असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ‘गिरीप्रेमी’च्या वतीने करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने २००३ पासून ११ डिसेंबर हा दिवस दरवर्षी पर्वतांशी निगडित वेगवेगळ्या संकल्पना मांडून जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी ‘पर्वत परिसंस्थांचे पुनर्संचयन’ अशी संकल्पना जाहीर करण्यात आली आहे. ‘गिरीप्रमी’च्या वतीने रविवारी फर्ग्युसन महाविद्यालयामागील हनुमान टेकडीच्या खाणीमध्ये सकाळी सात वाजता पर्वत पूजन करण्यात येणार आहे, तसेच सोमवारी (ता. ११) निसर्ग व पर्वत संवर्धनाची माहिती सांगणारा लघुपट पुण्यातील ५० शाळांमध्ये दाखविणार असून, शालेय विद्यार्थ्यांसमवेत ‘पर्वतांचे व त्यावर आधारित मानवसृष्टीचे महत्त्व’ यावर संस्थेचे गिर्यारोहक संवाद साधणार आहेत.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com