विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Published on

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे, ता. ३ : अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन भरून ऑफलाईन अर्ज महाविद्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या ७ जुलै २०२३ रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. महाविद्यालयांनी अर्जांची छाननी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत. अर्ज मुदतीत सादर न झाल्यास आणि त्यामुळे एखादा पात्र विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यास सामाजिक न्याय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाहीत, असेही सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी स्पष्ट केले.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.