इंटेलिजन्स कोअरचा स्थापना दिन उत्साहात

इंटेलिजन्स कोअरचा स्थापना दिन उत्साहात

पुणे, ता. ३ ः भारतीय लष्कराचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या इंटेलिजन्स कोअरचा (गुप्तचर विभाग) ८१वा स्थापना दिन नुकताच पार पडला. या निमित्ताने दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह यांनी इंटेलिजन्स कोअरमध्ये कार्यरत जवानांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच ‘सदा सतर्क’ या त्यांच्या ब्रीदवाक्‍यानुसार नेहमी कार्यरत राहण्याचे व अचूक आणि जलद माहिती पुरविण्याचे काम करत लष्कराला निर्णायक पावले उचलण्यास मदत करण्याचे आवाहन केले. युद्ध आणि शांतता या दोन्ही परिस्थितीमध्ये लष्कराच्या विविध कारवायांच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी संवेदनशील माहिती पुरविण्याचे कार्य इंटेलिजन्स कोअरतर्फे केले जाते. यामुळे लष्कराला देखील वेळेवर तसेच अचूक कृती करणे शक्य होते. त्‍यामुळे ही शाखा लष्करासाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे. सातत्याने बदलत असलेल्या युद्धनीती तसेच बहुआयामी आव्हानांना तोंड देण्यासाठी या विभागाद्वारे मोलाची भूमिका बजावली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com