सोमवारी अनुभवा
मुंग्यांचे अदभूत जग

सोमवारी अनुभवा मुंग्यांचे अदभूत जग

Published on

पुणे, ता. ३ ः पर्यावरण संरक्षणाबाबत लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्याबरोबर निसर्गप्रेमी, पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांना एकत्र आणण्यासाठी व निसर्गाच्या विविध क्षेत्राची माहिती देण्यासाठी पुणे वन विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम निसर्गावर आधारित असतील व ते सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून येत्या मवारी (ता. ६) सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत ‘मुंग्यांचे अदभूत जग’ या विषयावरील सादरीकरण होणार आहे. यामध्ये नूतन कर्णिक यांचे मुंग्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणार आहेत. नूतन गेली २० वर्षे कीटक शास्त्राचा अभ्यास करीत आहेत. हा कार्यक्रम सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गोखले नगर येथील वन भवनच्या दुसऱ्या मजल्यावर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.