बावधन वीज उपकेंद्रासाठी
सुळे यांचा उपोषणाचा इशारा

बावधन वीज उपकेंद्रासाठी सुळे यांचा उपोषणाचा इशारा

Published on

पुणे, ता. ३ : बावधन येथे वीज उपकेंद्र उभारावे, यासाठी वारंवार मागणी करूनही त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे येत्या वीस नोव्हेंबरपर्यंत हा प्रश्‍न मार्गी न लावल्यास उपोषण करण्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बावधन उपकेंद्रासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासाठी आवश्यक असणारी जागाही सुचविण्यात आली आहे. परंतु तरीही येथे सबस्टेशन उभारण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही, असे ट्विट खासदार सुळे यांनी केले आहे. महावितरण, पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि पुणे जिल्हाधिकारी यांना टॅग करत त्यांनी हे ट्विट केले असून येत्या २० नोव्हेंबरपर्यंत याबाबत कार्यवाही झाली नाही, तर आपण स्वतः बावधन येथे उपोषणाला बसू असा इशारा दिला आहे. जनतेच्या सुविधेसाठी हे सबस्टेशन आवश्यक आहे, परंतु जागा सुचवलेली असतानादेखील ऊर्जा खात्याकडून याबाबत कार्यवाही होत नाही हे खेदजनक आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.