मॉडेल कॉलनीत पगारावरून झालेल्या मारहाणीत कामगाराचा मृत्यू

मॉडेल कॉलनीत पगारावरून झालेल्या मारहाणीत कामगाराचा मृत्यू

Published on

मारहाण झालेला कामगार मृत्युमुखी
पुणे, ता. ३ : पगारावरुन झालेल्या वादातून मारहाण झालेला कामगार मरण पावला. शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी परिसरात हा प्रकार घडला. अविनाश भिडे (वय ३६, रा. बेनकर वस्ती, धायरी) असे मृत्युमुखी कामगाराचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानुसार शेखर महादेव जोगळेकर (वय ५८), प्रणव शेखर जोगळेकर (वय २२, दोघे रा. मॉडेल कॉलनी), दयानंद सिद्राम इरकल (रा. पांडव नगर), बाळू पांडुरंग मिसाळ (रा. कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (रा. शिवणे), रूपेश रवींद्र कदम, संतोष ऊर्फ बंटी दत्तात्रेय हरपुडे, प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर यांच्यासह अन्य चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भिडे हे जोगळेकर यांच्याकडे मशिन ऑपरेटर म्हणून कामास होते. त्यांच्यात पगारावरुन वाद झाला होता. एक सप्टेंबर रोजी आरोपींनी भिडे यांना बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या भिडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.