जोशी रेल्वे संग्रहालयात ‘वंदे भारत’ची प्रतिकृती

जोशी रेल्वे संग्रहालयात ‘वंदे भारत’ची प्रतिकृती

पुणे, ता. ४ ः जगभरातील विविध प्रसिद्ध रेल्वे प्रतिकृतींचे अनोखे संग्रहालय असलेल्या ‘जोशीज मिनिएचर रेल्वे म्युझियम’च्या स्थापनेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त संग्रहालयात लवकरच ‘वंदे भारत’ या देशाच्या पहिल्या हाय स्पीड रेल्वेच्या प्रतिकृतीचा समावेश केला जाणार आहे.
या रेल्वेच्या प्रतिकृतीचे अनावरण पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी म्युझियमचे रवी जोशी, देवव्रत जोशी, संदीप खर्डेकर, मंजुश्री खर्डेकर आदी उपस्थित होते. ही प्रतिकृती येत्या दोन आठवड्यांत संग्रहालयात उपलब्ध होणार आहे. याबाबत देवव्रत जोशी म्हणाले, ‘‘भारतीय रेल्वे विभागाकडून ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा आराखडा घेऊन, त्यानुसार आम्ही या प्रतिकृतीची रचना केली आहे. याचे प्रमाण साधारण १००:१ असे आहे. प्रत्यक्ष रेल्वेची रचना, त्यातील एअर सस्पेन्शन, स्ट्रीमलाईन बॉडी, अशा तांत्रिक गोष्टी प्रतिकृतीमध्ये हुबेहूबपणे साकारण्यात आल्या आहेत. या रेल्वेची एक प्रतिकृती साकारण्यासाठी आम्हाला तीन महिन्यांचा कालावधी लागला.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com