सुसंवादामुळे राहते नात्यांमध्ये प्रगल्भता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुसंवादामुळे राहते नात्यांमध्ये प्रगल्भता
सुसंवादामुळे राहते नात्यांमध्ये प्रगल्भता

सुसंवादामुळे राहते नात्यांमध्ये प्रगल्भता

sakal_logo
By

मला असे मनापासून वाटते की, कुटुंबव्यवस्था घरातल्या लोकांवर अवलंबून असते. घराला घरपण येते ते आपल्या माणसंमुळे, मग ते घरातली थोरली माणसं असू देत, युवक असू देत किंवा लहान मुलं असू देत. कुटुंबातील सुसंवादामुळे नात्यांमध्ये प्रगल्भता राहते.
कुटुंबातील सर्वजण माझ्या जवळचे आहेत. माझे आई-बाबा स्वभावाने खूप साधे होते. माझी आई खूप आनंदी आणि मनमोकळ्या स्वभावाची होती. जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असं तिचं नेहमी म्हणणं असे. नेहमी हसतमुख असणारी माझी आई सतत इतरांना मदत करण्यामध्ये पुढे असायची. माझ्या वडिलांना इतर लोकांबद्दल आस्था वाटायची, ते प्रत्येकाला मदतीचा हात द्यायचे. ते जेव्हा गेले, तेव्हा अक्षरशः लोकं हळहळले. आई-बाबांचं जाणं, हाच माझ्या आयुष्यातील एक हृद्य प्रसंग आहे. आम्ही नेहमी एकमेकांच्या जवळ मिळून-मिसळून राहिलेलो आहोत. मग आधी आई-बाबा आणि भाऊ आणि लग्नानंतर माझे यजमान व त्यांचे कुटुंबीय असे सगळे जणं एकत्रितपणे आनंदाने राहिलेलो आहोत. पतीच्या पश्चात आता मुलगा आणि मी एकत्र आहोत.
आम्ही सगळे एकत्र असताना पूर्वी आई-बाबा असताना आम्ही सर्व जण फिरायला जायचो. दोघेही खूप साहसी स्वभावाचे असल्यामुळे आम्ही कधी-कधी पर्वतारोहण देखील करायचो आणि पोहायला देखील जायचो. जेव्हा मी डेहराडूनला जाते, तेव्हा आम्ही सर्व एकत्र जास्तीत जास्त आनंदाने आणि मौजमस्तीत वेळ घालवतो. कुटुंबाचे महत्त्व अनेक प्रसंगांमुळे लक्षात राहते. यजमानांच्या जाण्यानंतर माझा मुलगा, आई आणि बाबा यांनी मला खूप सावरले. मला मानसिक आधार देण्यासाठी तिघांनी खूप मदत केली, तेव्हा मला त्या दुःखातून बाहेर पडता आले आणि मी स्वतःला चित्रीकरणात गुंतवून घेतले. नातेसंबंध चांगले होण्यासाठी सुसंवाद हाच एक असा धागा आहे, जो नाती घट्ट गुंफून ठेवतो. त्यामुळे आम्ही एकमेकांबद्दल गैरसमज न ठेवता समजून घेतो.
सद्या मी ‘एण्ड टीव्ही’वरील ‘हप्पू की उलटन पलटन’ या मालिकेत ‘कटोरी अम्मा’ची भूमिका सारकारत आहे. त्यामुळे नात्यांमधील सुसंवादासाठी वेळेचे गणित जुळवावो लागते. त्यातून शक्य तेवढा वेळ मी कुटुंबासाठी देते.


नाती दृढ होण्यासाठी....
१) सुख दुःखाच्या कोणत्याही प्रसंगी एकमेकांबरोबर राहा.
२) एकमेकांबरोबर प्रेमाने राहा.
३) एकमेकांना मदत करा.
४) एकमेकांना वेळ द्या.
५) सर्वांबद्दल मनात आस्थाभाव असू द्यात.

(शब्दांकन ः अरुण सुर्वे)