जिल्हा प्रशासनाकडून 
रोव्हर खरेदीसाठी निधी

जिल्हा प्रशासनाकडून रोव्हर खरेदीसाठी निधी

पुणे, ता. १० : शहरासह जिल्ह्यात राज्य सरकारकडून मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांसाठी संपादित करावयाच्या जागांचे मोजणी गतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डिपीसी) खर्चातून ४० पेक्षा अधिक रोव्हर मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरण, रिंगरोड, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॅरिडोअर, येरवडा-शिक्रापूर सहापदरी रस्ता, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ अशा अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी संपादित होणाऱ्या जमिनींची मोजणीचे काम गतीने मार्गी लागणे आवश्‍यक आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून साडेतीन कोटी रुपयांचा निधी ४० हून अधिक रोव्हर मशीन खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिला. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘ पुण्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प आणि इतर विकासकामे पाहता प्रथमच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २०२०-२१ मध्ये ५० लाख रुपये खर्च करून प्लॉटर मशीन खरेदी केले, तर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २ कोटी ९९ लाख रुपये मंजुरी प्राप्त करून ३५ रोव्हर मशीन जिल्ह्यासाठी खरेदी केले आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात होणारी विकासकामे, महत्त्वकांक्षी प्रकल्पांना गती आली आहे, तर भविष्यात नागरिकांच्या जमीन मोजणीच्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करता येणे शक्य होणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com