ऑक्टोबरमध्ये महापालिका 
निवडणुकीची शक्यता ः पाटील

ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुकीची शक्यता ः पाटील

पुणे, ता. १० ः ‘‘महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ९ मे नंतर न्यायालय उन्हाळी सुट्टीवर जाणार आहे, त्यामुळे ९ मे पुर्वी न्यायालयाने निकाल दिला तरच ऑक्‍टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्‍यता आहे.’’ असे सुतोवाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा केले.

पुणे महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका मागील एक ते दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. संबंधित प्रकरण सध्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. यासंदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारने अद्याप प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही. त्यामुळे याबाबतचा निकाल आणखी काही दिवस पुढे ढकलला आहे. दरम्यान, सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना महापालिका निवडणुकांबाबत प्रश्‍न विचारण्यात आले. पाटील म्हणाले, ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. मात्र, हा सर्व न्यायालयाशी संबंधित विषय असल्यामुळे त्याबाबत काही बोलता येणार नाही, परंतु ९ मे नंतर न्यायालयास उन्हाळ्याची सुट्टी लागेल. त्यामुळे त्यापुर्वी न्यायालयाने निकाल दिला तरच ऑक्‍टोबरमध्ये निवडणुका लागू शकतात. कारण जुनपासून पावसाळा सुरू होतो. तसेच दरम्यान, निवडणुकीच्या तयारीची कामे सुरू होतात. त्यात बराच कालावधी जातो. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात, असा माझा प्राथमिक अंदाज आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com