महम्मदवाडीतील हेवन पार्क 
सोसायटीत पाण्याचा प्रश्‍न गंभीर

महम्मदवाडीतील हेवन पार्क सोसायटीत पाण्याचा प्रश्‍न गंभीर

पुणे, ता. १० ः पाणी पुरवठा सुरळीत करावा, डीपी रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, पिण्याच्या पाण्यामध्ये जात असलेले मैलापाणी बंद करावे, अशा विविध मागण्यांसाठी महम्मदवाडी येथील हेवन पार्क सोसायटीतील निवृत्त पोलिस अधिकारी व सरकारी कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. महापालिका प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही.

महम्मदवाडी येथील हेवन पार्क येथील सोसायटीला काही वर्षांपासून पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. त्याबाबत त्यासाठी त्यांनी बूस्टर पंप बसविण्याची मागणी लष्कर पाणी पुरवठा विभागाकडे केली होती. सात ते आठ वर्ष उलटूनही प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही. पाण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. याबरोबरच हेवन पार्क या सर्व्हे क्रमांक ४७/४८ मध्ये डीपी रस्त्याचे काम रखडलेले आहे, त्यामुळेही नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेच्या लाइन क्रमांक ११ व १२ मध्ये मैलापाणी व कॉंक्रीट रस्ता नाही, १ ते १२ लाईनमध्ये अर्धवट रस्ते आहेत. संबंधित प्रश्‍न तत्काळ सोडविण्याची नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी सोसायटीतील रहिवासी ज्ञानेश्‍वर अडसुळे, जंगमितसिंग कोचर, प्रदीप जाधव, उदय साळवे यांनी सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनानंतरही महापालिका प्रशासनाने त्यांची दखल घेतली नसल्याच आरोप त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com