‘एलन’च्या वर्धापन दिनानिमित्त १०० विद्यार्थींनींना मोफत कोचिंग

‘एलन’च्या वर्धापन दिनानिमित्त 
१०० विद्यार्थींनींना मोफत कोचिंग
Published on: 

कोटा, ता. १८ ः एलन करिअर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडने ३५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘आशा स्कॉलरशिप’ अंतर्गत नुकतीच एक हजार विद्यार्थिनींना मोफत कोचिंग देण्याची घोषणा केली. एलन कॅरिअर इन्स्टिट्यूट संचालक डॉ. गोविंद माहेश्वरी, राजेश माहेश्वरी, नवीन माहेश्वरी व डॉ. बृजेश माहेश्वरी हे चारही भाऊ चालवित आहेत. त्यांची पुढची पिढी अविरल माहेश्वरी, अमन माहेश्वरी, आनंद माहेश्वरी, केशव माहेश्वरी व आराध्य माहेश्वरी हे देखील त्यांच्याबरोबर सक्रिय आहे.

एलनचे संचालक डॉ. गोविंद माहेश्वरी या बाबत म्हणाले, ‘‘१८ एप्रिल १९८८ रोजी एलन करिअर इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. सामाजिक जबाबदारी समजून एलन विद्यार्थी घडवित आहे. या भूमिकेतून या वर्षी एक हजार विद्यार्थिनींना मोफत कोचिंग देण्यात येईल. एलनच्या ७ देशांत शाखा असून भारतात २२ राज्यांत आणि ४ केंद्रशासित प्रदेशांत ५३ शहरांत स्टडी सेंटर आहे. त्याद्वारे विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरू आहे. देशातील सर्व राज्यांतील शासकीय शाळांतील गरजू आणि हुशार विद्यार्थीनींना आशा योजनेअंतर्गत विविध सेंटरवर मोफत कोचिंग दिले जाईल.’’ या पूर्वीही अनेक राज्यांतील सरकारच्या सहकार्याने अनेक विद्यार्थींनींना एलनने मोफत कोचिंग दिले आहे. या बाबतचे प्रकल्प राजस्थान, हरियाना, मध्य प्रदेश, आसामसह अनेक राज्यांत प्रकल्प कार्यान्वित आहेत. कोरोनाचा फटका बसलेल्या कुटुंबातील ३०० विद्यार्थींनींना मोफत कोचिंग दिले जात आहे. शौर्य शिष्यवृत्तीअंतर्गत शहीदांच्या मुलांना ९० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जात असून लष्कर, निमलष्करी दलातील जवानांच्या मुलांनाही सवलतीमध्ये कोचिंग दिले जाते. तसेच एलनच्या विशेष शिष्यवृत्तीअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देण्यात येते, असे एलनतर्फे स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com