डॉ. महेश कोटबागी यांना डी.लिट पदवी

डॉ. महेश कोटबागी यांना डी.लिट पदवी

पुणे, ता. २२ ः रोटरीच्या माध्यमातून गेली ३० वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असणारे डॉ. महेश कोटबागी यांचा जयपूर विद्यापीठाने डी.लिट पदवी देऊन सन्‍मान केला आहे. जयपूर येथे नुकतेच झालेल्या कार्यक्रमात डॉ. कोटबागी यांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. कोटबागी हे सध्या रोटरी इंटरनॅशनलचे संचालक असून ई. लर्निंग या शैक्षणिक परिभाषेची गेल्या १० वर्षात त्यांनी १०० हून अधिक देशात सुरवात केली आहे. तर रोटरीच्या ‘रोटरी इंडिया लिट्रसी मिशन’ या योजनेचे ते प्रमुख सल्लागार आहेत. ग्रामीण भागातील जीर्णावस्थेत असलेल्या २०० शाळांचे पुननिर्माण केले. अशा त्‍यांच्या विविध सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना जयपूर विद्यापीठाने हा सन्‍मान दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com