वाहनाच्या विक्रीचा रिव्हर्स गियर, विक्री घटली

वाहनाच्या विक्रीचा रिव्हर्स गियर, विक्री घटली

पुणे, ता. २२ ः वाहन उत्पादकांनी उत्पादन कमी केल्याचा परिणाम बाजारपेठांवर दिसून आला. अक्षय तृतीयेच्या निम्मिताने वाहनांची विक्री वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतू गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहन विक्रीत घट झाली आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारी वाहनाच्या बाजारपेठेत ग्राहकांचा उत्साह जाणवून आला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवी वाहने घेण्यासाठी मागील दिवसांपासून अनेक ग्राहकांनी गाडी बुक करून ठेवल्या होत्या. दुचाकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना तर चारचाकी मध्ये हायब्रीड वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. चारचाकीमध्ये वाहनांमध्ये ९ ते ११ लाख दरम्यान किंमत असलेल्या वाहनांची विक्री झाली आहे.

काय सांगतात आकडे :
दुचाकी चारचाकी गुड्स रिक्षा बस अन्य एकूण
मागच्या वर्षी (२६ एप्रिल ते ३ मे २२):
२,८४० १९७२ २१३ ४० ३८ ९५ ५,१९८
यंदाच्या वर्षी (१५ एप्रिल ते २२ मे २३ ):
३,०५१ १,३४३ ३२५ १८६ २३ २२४ ५,१५२

इलेक्ट्रिक वाहने :
मागच्या वर्षी (२६ एप्रिल ते ३ मे २२):
३९३ २८ ४ ० ३६ ० ४६१
यंदाच्या वर्षी (१५ एप्रिल ते २२ मे २३ ):
३७० २६ ११ ९ ० ० ४१६

वाहन विक्री का घटली :
- बीएस ६ नंतर इंजिन मध्ये देखील बदल केला.आता इ २० हे नव्या प्रकारचे इंजिन विकसित केले जात आहे.
- पेट्रोल मध्ये २० टक्के इथेनॉलचा वापरासाठी या इंजिनची निर्मिती केली जात आहे.
- नव्या बदलामुळे कंपन्यांनी नवीन वाहनांचे उत्पादन काही प्रमाणात कमी केले
- वाहनांच्या किमती गेल्या पाच वर्षात सुमारे २० ते २२ टक्क्यांनी वाढल्या

यंदाच्या वर्षी इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला.अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी अनेकांनी बुकिंग करून ठेवले होते. तर काही जणांनी आजच्या दिवशीच शोरूम मध्ये येऊन वाहनाची खरेदी केली.
-अनुराग हिवाळे, सीनियर सेल्स एक्सक्युटीव्ह, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com