वेबसाइट हॅक झाल्याचे सरकारने 
सांगणे धक्कादायक : तिवारी

वेबसाइट हॅक झाल्याचे सरकारने सांगणे धक्कादायक : तिवारी

पुणे, ता. २२ ः केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट या धोक्‍यात आले असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. खुद्द सरकारनेच असे सांगणे हे धक्कादायक व नामुष्कीचे आहे. याउलट सरकारने संबंधित सरकारी वेबसाइट हॅक करण्याची धमकी देणाऱ्या "इंडोनेशिया हॅक्‍टीव्हीस्ट''वर काय कारवाई केली, हे जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या अधिकृत व अतिमहत्त्वाच्या वेबसाइट स्लोडाऊन व्हाव्यात, सरकारी सेवांचा लाभ कोणालाही घेता येऊ नये, या हेतूने इंडोनेशियातील हॅक्‍टीव्हीस्टकडून धमकी दिली होती. गुजरात सरकारची वेबसाईटही त्यांनी हॅक करण्याचा प्रकार केला. हा प्रकार धक्कादायक व संशयाग्रस्त आहे, भारतावर अशा पद्धतीची नामुष्की पहिल्यांदाच आली आहे.
लोकशाहीमध्ये सरकार बदलत असते, मात्र विविध सरकारांच्या काळातील योजनांचे सत्य आणि तथ्य वेबसाइटवर अबाधित असणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने केंद्र सरकारने देशातील जनतेस या सरकारी वेबसाईटच्या सुरक्षेविषयी आश्‍वासित करून केंद्र व राज्य सरकारांनी आपले उत्तरदायित्व पार पाडावे, अशी मागणी गोपाळ तिवारी यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com