वाहतूक अभियानाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

वाहतूक अभियानाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

#KoneHaMaath - लोगो
पुणे, ता. २४ : शहर पोलिस आणि शहर वाहतूक शाखेकडून पुण्यात #कोणेहामाठ? हे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला सकाळ माध्यम समूहाचे सहकार्य लाभले आहे. या अभियानामागचा उद्देश, पुण्यातील वाहतुकीमध्ये सुधारणा करणे आणि नागरिकांना वाहतुकीच्या नियम पाळण्याचे महत्त्व समजून देणे आहे. या अभियानाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या संदर्भात ट्विटरवर प्राप्त झालेल्या काही प्रातिनिधिक सूचना आणि प्रतिक्रिया.

@JP Shonaa खूप चांगला उपक्रम! नियम न पाळणाऱ्या माठांमुळेच रस्त्यावर वाहन चालवणे धोकादायक बनले आहे. पुण्यात राहणाऱ्या लोकांना याची गरज होती. लोकांनी स्वतः वाहतुकीचे नियम पाळायला सुरुवात केली तर इतरांचे दोष दाखवण्याची वेळ येणार नाही. यामुळे स्वतःबरोबरच इतरांचाही जीव वाचेल.

@96Maratha111111 अतिशय छान उपक्रम आहे. जे वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, त्यांनी नियमांकडे खूप लक्ष देणे आवश्यक आहे.

@TejasMarathi
वाहतुकीचे नियम न पाळणारे बेशिस्त वाहनचालक आणि शहराबाबत सकारात्मक भावनेचा अभाव ही पुण्यातील मोठी चिंता आहे. जीवन मौल्यवान आहे, तुमच्यासाठी आणि इतरांसाठीही.

@MangeshGidde शहर आणि उपनगरांमधील वाहतूक नियंत्रणाचे दिवे २४ तास सुरू ठेवावेत. ऑनलाइन चलन जारी करण्यासाठी प्रत्येक सिग्नलवर सीसीटीव्ही लावावेत. तरच लोक वाहतुकीचे नियम पाळतील.

@pavan13hr पुण्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सार्वजनिक वाहतूक प्रबळ हवी होती. पण दुर्दैवाने ही व्यवस्था सक्षम नाही.

@molakds
आपण म्हणता हे खरे आहे. पुणे शहराच्या वाहतुकीसाठी हाच एकमेव पर्याय आहे असे मला वाटते.

@PunekarPuneri लक्ष्मी रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी चारचाकी वाहने, रिक्षा उभ्या असतात. आधीच रस्ता छोटा, त्यात दोन्ही बाजूलाही वाहने. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

@grohan84 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक सिग्नल येथे औंधमार्गे येणाऱ्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दर चार महिन्यांनी करावेत.

@kiranpawarspeak काही ठिकाणी वाहन उभे करण्यास बंदी आणि सम-विषम वाहनतळ यांचे फलक नाहीत. शहर वाहतूक पोलिसांनी त्यांचेच बोधचिन्ह असलेले सूचनाफलक मराठीत लावावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com