electricity bill arrears
electricity bill arrearssakal

Electricity Arrears : पुणे परिमंडळात वीजग्राहकांकडे १३३ कोटींची थकबाकी

पुणे परिमंडलातील ६ लाख ६० हजार ५२७ या सर्व प्रकाराच्या वीजग्राहकांकडे १३३ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे.
Summary

पुणे परिमंडलातील ६ लाख ६० हजार ५२७ या सर्व प्रकाराच्या वीजग्राहकांकडे १३३ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे.

पुणे - पुणे परिमंडलातील ६ लाख ६० हजार ५२७ या सर्व प्रकाराच्या वीजग्राहकांकडे १३३ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २ हजार २०० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (ता. २९) व रविवारी (ता. ३०) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे.

सद्यस्थितीत पुणे शहरात एकूण २ लाख ८८ हजार २३६ वीजग्राहकांकडे ४६ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख ९ हजार ७७१ ग्राहकांकडे ३५ कोटी ३७ लाख रुपये, वाणिज्यिक २१ हजार १०५ ग्राहकांकडे १० कोटी २१ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ९४९ ग्राहकांकडे ५ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर १ हजार ५१८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरात एकूण १ लाख ३८ हजार ४६६ वीजग्राहकांकडे ३५ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख १६ हजार ९२६ ग्राहकांकडे १९ कोटी १२ लाख रुपये, वाणिज्यिक १७ हजार ६६५ ग्राहकांकडे ७ कोटी ७८ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार ८७५ ग्राहकांकडे ८ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ४५७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

ग्रामीण भागात ५१ कोटींची थकबाकी
ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण २ लाख ३३ हजार ८२५ वीजग्राहकांकडे ५१ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर २२५ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com