वीज ग्राहकांचे समाधान हेच ध्येय

वीज ग्राहकांचे समाधान हेच ध्येय

पुणे, ता. २ : ‘मूलभूत गरज बनलेल्या वीज क्षेत्रात सेवा देण्याचे भाग्य वीज अभियंता व कर्मचारी म्हणून आपल्याला लाभले. त्यासाठी प्रत्येक वीजग्राहकाचे समाधान हे महावितरणचे ध्येय कायम जोपासत राहा’, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले.

महावितरणच्या पुणे परिमंडलातील २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या उत्कृष्ट १३ यंत्रचालक व ४३ तांत्रिक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी पवार बोलत होते.

उत्कृष्ट कर्मचारी - अनिल जाधव, पुरूषोत्तम झिंगरे, सुशिला कड, अमोल पाटील (बंडगार्डन विभाग), जनार्दन गायकवाड, योगेश बांदल, राहुल इंगळे, योगेश पवार (नगररोड विभाग), सागर कांबळे, दत्ता कांबळे, बाळासाहेब सांडभोर, चंद्रकांत बागवले (पदमावती विभाग), सचिन झांबरे, रोशन ढोबळे, सफल अताग्रे, मोहन दारवटकर (पर्वती विभाग), दत्तात्रय वाल्हेकर, सुरेश एजगर, योगेश वानेरे, समाधान मोरे, निरंजन ठणठणकार (रास्ता पेठ विभाग), शरद डगळे, दत्तात्रय हुले, संतराम बनसोडे, अविनाश चौगुले, श्यामकुमार नेवारे, सचिन चिंचोलीकर (मंचर विभाग), स्वप्नील अवचट, गणेश लोखंडे, अमोल कोंडे, सूर्यकांत शिंदे, शरद वाघमारे, पुनाजी चौरे (मुळशी विभाग), धनाजी काळे, ज्ञानेश्वर होले, अमर कोंढाळकर, अजित दजगुडे, हरिदास आंबेकर, सुरेश कोकणे (राजगुरूनगर विभाग), संतोष कांबळे, काळू मोहरे, तुळशीराम गवळी, गुलाब पठाण (भोसरी विभाग), चंद्रशेखर बधे, नीलेश निंबाळकर, पांडुरंग भोसले, बंडू खर्जुले (कोथरूड विभाग), दिनेश कारंडे, हरीश मानकर, अशोक मुळे, काशिनाथ वाजे (पिंपरी विभाग), महादू ठाकरे, सचिन मुंडे, शेषनारायण फावडे, गणेश सेलूकर व हणमंत शिंगटे (शिवाजीनगर विभाग).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com