क्रेडाई महाराष्ट्रतर्फे ‘कृतज्ञता सप्ताह’

क्रेडाई महाराष्ट्रतर्फे ‘कृतज्ञता सप्ताह’

पुणे, ता. २ : बांधकाम मजुरांप्रती असणारा आदर कृतीतून व्यक्त करण्याच्या विधायक भावनेतून क्रेडाई महाराष्ट्रतर्फे ‘कृतज्ञता सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. १ मेपासून या उपक्रमाला प्रारंभ झाला असून ८ मेपर्यंत हा सप्ताह राज्यातील विविध शहरांत साजरा होईल. त्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांची आखणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे, अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.

खैरनार म्हणाले, ‘‘बांधकाम मजूर म्हणजे बांधकाम क्षेत्राचा पाया. एकूणच बांधकाम क्षेत्राच्या विकासात्मक वाटचालीत बांधकाम मजुरांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करणे ही जबाबदारी नसून आमचे कर्तव्य आहे. म्हणूनच येत्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून क्रेडाई महाराष्ट्रतर्फे राज्यातील विविध शहरांमध्ये हा उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे.’’ सचिव विद्यानंद बेडेकर, कामगार कल्याण आणि कौशल्यविकास विभागाचे निमंत्रक सुनील पाटील, क्रीडा आणि सीएसआर विभागाचे निमंत्रक गोपेश यादव, प्रितेश गुजराथी, दीपा पतारे, अमिना मुल्ला, नरेंद्र कुलकर्णी आणि सह संयोजक संदीप मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहर संघटनांना पुरस्कार तसेच ‘बांधकाम कामगारांसाठी सर्वोत्कृष्ट काळजी घेणारे विकसक’ यासाठी एक विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com