आचार्य श्री विजय वल्लभ शाळेतील
विद्यार्थ्यांची ‘टीसीएस’ला भेट

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेतील विद्यार्थ्यांची ‘टीसीएस’ला भेट

पुणे, ता. २ : आचार्य श्री विजय वल्लभ शाळा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘टीसीएस सीएसआर गो आयटी’ व्यासपीठावर झालेल्या सत्रात तयार केलेल्या ॲपचे सादरीकरण करण्यात आले.

या सादरीकरणातून दोन सर्वोत्कृष्ट संघांची निवड केली. या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांनी टीसीएसला भेट दिली. यात नववीमधील पलक बांगड, निशा कवाड, शिखा त्रिवेदी, मोनिता सोलंकी, कशिश सगरा यांनी शिक्षिका प्रीती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘झिरो स्ट्रेस’ हे ॲप तयार केले. मुख्याध्यापिका दीपाली तारे, दीपज्योती अत्रे, महेश राऊत यांनीही टीसीएसला भेट दिली. यावेळी टीसीएसच्या प्रांगणात असणारी विविध संशोधन केंद्रे, तज्ज्ञ, क्लायंट मीटिंग हे प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. टीसीएसमधील मान्यवरांसमोर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ॲपचे सादरीकरण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com