संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे
वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे, ता. २ : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे येरवड्यातील संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात अकरावी, बारावी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या शंभर मागासवर्गीय विद्यार्थिनींना मोफत प्रवेश देण्यात येतो, आणि त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, अशी माहिती संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातर्फे देण्यात आली आहे.

या वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना दरमहा आठशे रुपये निर्वाहभत्ता, शंभर रुपये स्वच्छतेसाठी दिले जातात. शैक्षणिक साहित्यासाठी (स्टेशनरी) चार हजार रुपये प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी दिले जातात. सहल, गणवेश, ॲप्रन आणि प्रकल्पांसाठी देखील नियमानुसार साहित्य पुरविण्यात येते.
या वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थिनींनी तहसीलदारांचा मागील वर्षाचा उत्पनाचा दाखला, मागील वर्षाचे गुणपत्रक, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र अशी कागदपत्रे सादर करावीत. इच्छुक विद्यार्थिनींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे अथवा गृहपाल, संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, येरवडा येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्यावतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com