‘ट्रान्सफार्मर’च्या सुरक्षेवर कार्यशाळा

‘ट्रान्सफार्मर’च्या सुरक्षेवर कार्यशाळा

पुणे, ता. २ : ‘शहरातील अनेक ट्रान्सफॉर्मरची अवस्था दयनीय आहे. त्यांची निगा राखणे अतिशय गरजेचे आहे,’ असे मत इरडाचे संचालक राजराम शिंदे यांनी व्यक्त केले. विद्युत सुरक्षा मंच आणि सीईईएएमए यांच्या वतीने ‘शहरी भागातील ट्रान्सफॉर्मरची सुरक्षा’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिंदे यांनी हे मत व्यक्त केले.

मंचाचे राजीव जतकर, अमर पाटील, सीईईएएमएचे नरेंद्र दुवेदी, विद्युत निरीक्षक नितीन सूर्यवंशी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. या वेळी शिंदे यांनी विविध प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरर्सची सविस्तर माहिती दिली. पुणे शहरातील तळघरातील ट्रान्सफॉर्मर सुरक्षित राहण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना व मार्ग उपलब्ध आहेत, यांचीदेखील माहिती त्यांनी दिली. या वेळी विविध वक्त्यांची भाषणे झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com