प्रा. जयंत नारळीकर यांना
डॉ. गोविंद स्वरूप पुरस्कार

प्रा. जयंत नारळीकर यांना डॉ. गोविंद स्वरूप पुरस्कार

पुणे, ता. १३ : आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राचे (आयुका) संस्थापक आणि प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांना पहिल्या ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) इंदूर येथे झालेल्या एएसआयच्या ४१ व्या बैठकीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, प्रा. नारळीकर तो स्वीकारण्यासाठी प्रवास करू शकले नाहीत. ‘एएसआय’चे अध्यक्ष प्रा. दीपंकर बॅनर्जी यांनी पुण्यात येऊन प्रा. नारळीकर यांना हा पुरस्कार प्रदान केला.

खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञाला गौरविण्यासाठी भारतीय खगोलशास्त्र संस्थेने गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्काराची स्थापना केली. या प्रसंगी बोलताना प्रा. बॅनर्जी म्हणाले, ‘‘प्रा. स्वरूप आणि प्रा. नारळीकर या दोघांनीही खगोल भौतिकशास्त्राच्या वाढीसाठी देशात आदर्श संस्था उभ्या केल्या. दोघांचीही कार्यक्षेत्रे भिन्न असली तरी त्यांनी तरुणपिढीच्या प्रशिक्षणासाठी प्रचंड परिश्रम घेऊन अमूल्य योगदान दिले. त्यांनी भावी अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत कार्य केले आहे, करत आहेत.’’ या वेळी आयुकाचे संचालक आर. श्रीआनंद उपस्थित होते.

फोटो : 42752

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com