ससून रुग्णालयात स्थूलता तपासणी शिबिर

ससून रुग्णालयात स्थूलता तपासणी शिबिर
Published on

पुणे, ता. ३ ः राज्यातील स्थूलत्व जनजागृती व प्रतिबंध अभियानांतर्गत ससून रुग्णालयात १६० सरकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात टपाल खाते, समाज कल्याण आयुक्तालय, फोटोझिंको कार्यालयांचा समावेश आहे. या कार्यालयांमध्ये ससून रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने वजन, उंची, रक्तदाब तसेच रक्तशर्करा यांच्या तपासणी केली. तसेच, स्थूलत्वाबाबत समुपदेशन आणि मार्गदर्शन केले. या अभियानाला बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. यात हरीश उम्रजकर, डॉ. हर्षल भीतकर, डॉ. नेहा सूर्यवंशी यांच्यासह इतर डॉक्टर, परिचारिका सहभागी झाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.