सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

Published on

पुणे, ता. ६ : सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना आता मोफत गणवेश मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता एकूण ७५.६० कोटी, तर विद्यार्थ्यांना बूट आणि पायमोजे उपलब्ध करून देण्यासाठी ८२.९२ कोटी रुपये इतका निधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत खर्च करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
गणवेश द उपलब्ध करून देण्यासाठी प्रति विद्यार्थी सहाशे रुपये, याप्रमाणे २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता एकूण ७५.६० कोटी तसेच, सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे उपलब्ध करून देण्याकरिता प्रति विद्यार्थी १७० रुपये याप्रमाणे ८२.९२ कोटी इतका निधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत खर्च करण्यात मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेमधून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातींची सर्व मुले, दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश देण्यात येत होता. परंतु आता शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातींची सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची सर्व मुले यांच्याबरोबरच योजनेतून वंचित राहणाऱ्या इतर प्रवर्गातील दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांकरिता देखील आता दरवर्षी दोन मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे मोफत गणवेश योजनेप्रमाणेच सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे याचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येईल, असे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इ. मु. काझी यांनी अध्यादेशात स्पष्ट केले आहे.

आदेशात काय म्हटले आहे?
- मंत्रिमंडळाच्या २८ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार हा अध्यादेश काढला आहे.
- यात मोफत गणवेश आणि एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे या योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून करण्यात येणार
- विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी प्रति विद्यार्थी सहाशे रुपये, याप्रमाणे २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता एकूण ७५.६० कोटी रुपये
- एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे देण्याकरिता प्रति विद्यार्थी १७० रुपये
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत खर्च करण्यात मान्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.