डी. वाय. पाटील डेंटल स्कूलच्या सेवेला मुदतवाढ

डी. वाय. पाटील डेंटल स्कूलच्या सेवेला मुदतवाढ

Published on

पुणे, ता. ६ ः महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर व दंतचिकित्सकांची सेवा देण्याच्या काराराला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये या मुदतवाढीला मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालय व चऱ्होली बुद्रूक येथील डी. वाय. पाटील डेंटल स्कूलमध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर व दंतचिकित्सकांची सेवा देण्यासंदर्भात काही वर्षांपूर्वी करार झालेला आहे. संबंधित करार संपुष्टात येत असल्याने त्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी डी. वाय. पाटील डेंटल स्कूलच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. या प्रस्तावाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली. त्यामुळे संबंधित महाविद्यालयाला आगामी पाच वर्ष सेवा पुरविण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.