विद्यार्थ्यांची नोंदणी एक लाख ६९ हजार

प्रवेश प्रक्रिया; राज्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे वाढता कल

विद्यार्थ्यांची नोंदणी एक लाख ६९ हजार प्रवेश प्रक्रिया; राज्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे वाढता कल

Published on

पुणे, ता. ८ ः राज्यातील विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे कल वाढत आहे. कोरोनापूर्वी काहीसे कमी झालेली प्रवेश संख्या आता वाढली आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. आता त्यालाच पुष्टी देणारी प्रवेश नोंदणी झाली आहे. अभियांत्रिकीसाठी शुक्रवारपर्यंत (ता. ७) एक लाख ६९ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यातील एक लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात अभियांत्रिकी, कृषीसह विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. अभियांत्रिकी पदवीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत संपली असून, कृषी अभ्यासक्रमासाठी रविवार (ता.९) पर्यंतचा कालावधी आहे. सीईटी सेलकडून. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी, कागदपत्र अपलोड व पडताळणी तसेच अर्ज निश्चितीसाठी मुदत देण्यात आली आहे. अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचाच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समावेश केला जातो.

इतर अभ्यासक्रमांची नोंदणी...
कृषी अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत रविवार (ता.९) पर्यंत आहे. शुक्रवार (ता.७) जुलैपर्यंत जवळपास २४ हजार ४५८ जणांनी नोंदणी केली असून सुमारे १७ हजार ५०६ जणांनी अर्ज निश्चिती केली आहे. तर एमबीएसाठी ५२ हजार ४२६ जणांनी नोंदणी आणि त्यापैकी ३० हजार ८४० विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केला आहे. एमबीएसाठी १४ तारखेपर्यंत अर्ज निश्चिती करता येणार आहे. विधी, एमसीए व बीपीएड अभ्यासक्रमांसाठीही नोंदणी सुरू आहे. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी बुधवार (ता.५) पर्यंत सुमारे ३६ हजार ५०० जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार जणांनी अर्ज निश्चित केला. बीपीएडला यंदाही कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पाच तारखेपर्यंत केवळ साडे चार हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून अडीच हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केली आहे.

अभ्यासक्रमांची नोंदणीची स्थिती (७ जुलै पर्यंत)
अभ्यासक्रम ः नोंदणी ः अर्ज निश्चिती
कृषी ः २४,४५८ ः १७,५०६
अभियांत्रिकी ः १,६९,५६४ ः ः १,४०,२६६
एमसीए ः १७,९२८ ः १०,७१०
विधी (३वर्षे) ः ४६,६२७ ः ३६,४१९
विधी (५ वर्षे) ः १३,९५४ ः १२,७६७
बीएड ः ३५,१७२ ः २४,८७४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.