माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळातर्फे 
‘द्रोणालय ३.०’ कार्यक्रम

माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळातर्फे ‘द्रोणालय ३.०’ कार्यक्रम

Published on

पुणे, ता. ८ : माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळातर्फे ‘द्रोणालय ३.०’ हा निवासी करिअर कौशल्य बुस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे. युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम २१ ते ३० जुलै या कालावधीत होणार आहे. माहेश्वरी युवकांसाठी ज्ञान देणारी सत्रे, जीवन कौशल्ये आणि सर्वांगीण विकास, मार्गदर्शकाचा सल्ला, तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी, औद्योगिक क्षेत्रांना भेटी, व्यावसायिक कौशल्ये, उद्योजकता आणि नाविन्यता हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असणार आहे. माहेश्वरी तरुणांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी ‘द्रोणालय’ची तिसरी बॅच आता सुरू होणार आहे. मंडळाने सुरू केलेला हा एक व्यापक, व्यवहारिक आणि प्रशिक्षण कार्यक्रम आहे. कार्यक्रमात करिअर मार्गदर्शनाबरोबरच तरुणांच्या आवडी समजून घेत त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक आणि गतिमान जगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करण्यात येते. हा पुण्यात होणारा दहा दिवसांचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यात व्यावसायिक, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. इच्छुक माहेश्वरी तरुणांनी याबाबत अधिक माहितीसाठी https://www.mvpm.org/dronalaya संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.