गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

Published on

पुणे, ता. ८ : गुंतवणुकीच्या बहाण्याने तरुणाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन बाबूराव ठाकरे, महेश्वर रेड्डी, संदीप कोऱ्हाळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अजय दिलीप सोंडकर (वय ३४, रा. भोसरी) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रेड्डी, कोऱ्हाळे यांची तक्रारदार सोंडकर यांच्याशी ओळख आहे. आरोपींनी त्यांना एका खासगी कंपनीत गुंतवणूक केल्यास दररोज दोन टक्के परतावा देण्यात येईल, असे आमिष दाखविले होते. सोंडकर यांनी धनादेशाद्वारे तीन लाख ६० हजार रुपये आरोपींना दिले. सोंडकर यांनी पैसे गुंतवल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. सोंडकर यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. तेव्हा आरोपींनी सोंडकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक प्रियांका शेळके तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.