डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Published on

पुणे, ता. ८ : भरधाव डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव बुद्रुक येथील सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाजवळ घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी डंपरचालकास अटक केली. अनुष्का अडागळे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.
मारुती सोपानराव शिंदे (वय ४७, रा. गुलमोहर कॉम्प्लेक्स, किरकटवाडी) असे अटक केलेल्या डंपरचालकाचे नाव आहे. याबाबत अनुष्काच्या मित्राने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का आणि तिचा मित्र गुरुवारी (ता. ७) दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरून कॅनॉल रस्त्याने जात होते. पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली. पाठीमागे बसलेल्या अनुष्काच्या डोक्याला मार लागला. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार जखमी झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक अक्षय पाटील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.