फुले- शाहू अभ्यासिकेचे उद्‍घाटन

फुले- शाहू अभ्यासिकेचे उद्‍घाटन

Published on

पुणे, ता. १० ः वडारवाडीतील नरेगल मठ येथे लोकायत नागरी समिती संचलित फुले - शाहू अभ्यासिका आणि वाचनालयाचे उद्‍घाटन पोलिस उपनिरीक्षक स्नेहा पवार यांच्या हस्ते नुकतेच झाले.

‘‘वस्तीतील मुला-मुलींमध्ये खूप क्षमता असतात, परंतु योग्य मार्गदर्शन व अभ्यासयोग्य जागेअभावी नेहमी ते मागे राहतात. वस्ती पातळीवर अशा प्रकारची वाचनालये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे,’’ असे मत पवार यांनी उद्‍घाटनप्रसंगी मांडले. या अभ्यासिकेसाठी वीर लहुजी मित्र मंडळाच्या नागेश डोंगरे यांनी सहकार्य केले. मुलांमध्ये वाचनाची आवड व अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने अभ्यासिका आणि वाचनालयची सुरुवात केली आहे, असे मत उपक्रमाचे समन्वयक श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी मांडले. वर्षा संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.