धरणांतील पाणीसाठा २८ टक्के

धरणांतील पाणीसाठा २८ टक्के

Published on

पुणे, ता. १० : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्यामुळे पाणीसाठ्यात टप्प्याटप्पाने वाढ होत आहे. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांतील पाणीसाठा २८ टक्क्यांवर पोचला आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांत मिळून एकूण ७.८९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच २८.०८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी १० जुलैपर्यंत चारही धरणांत २६.५६ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरण परिसरात १५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणक्षेत्रांत प्रत्येकी १३ मिलिमीटर, तर खडकवासला धरणक्षेत्रात अवघ्या एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात टेमघर धरण परिसरात तीन मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात प्रत्येकी चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर खडकवासला धरणक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली. टेमघर धरणात ०.५३ टीएमसी (१४.३६ टक्के), वरसगाव धरणात ३.४० टीएमसी (२६.५२ टक्के), पानशेत धरणात २.९० टीएमसी (२७.२२ टक्के) आणि खडकवासला धरणात १.०६ टीएमसी (५३.७८ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अन्य धरणांच्या परिसरातही दररोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. या धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ होत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.