म्हाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीस ट्रॅक्‍टर भेट

म्हाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीस ट्रॅक्‍टर भेट

Published on

पुणे, ता. ११ : म्हाळुंगे इंगळे (ता. खेड) ग्रामपंचायतीला कचरा संकलनासाठी नाईकनवरे डेव्हलपर्सच्या वतीने नवीन ट्रॅक्‍टर भेट देण्यात आला.
म्हाळुंगे इंगळे गावामध्ये कचऱ्याचा व्यवस्थापनासाठी पाच वाहने ठेवली आहेत. मात्र ट्रॅक्‍टर उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने नाईकनवरे डेव्हलपर्स यांच्याकडे ट्रॅक्टरसाठी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रमुख हेमंत नाईकनवरे यांच्या हस्ते म्हाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीला ट्रॅक्‍टर भेट देण्यात आला. यावेळी सरपंच अर्चना महाळुंगकर, उपसरपंच विश्‍वनाथ महाळुंगकर, मंगल भोसले, मयूरी महाळुंगकर, राजेंद्र सात्रस, मुख्य अधिकारी शंकर खेतावत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.