शिकाऊ वाहन परवानाण्याचे
काम पाच तास बंद

शिकाऊ वाहन परवानाण्याचे काम पाच तास बंद

Published on

पुणे, ता. १० ः पुणे आरटीओ कार्यालयातील वाहन परवाना विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतन न मिळाल्याने सोमवारी सकाळी साडे सात ते दुपारी साडे बारा वाजेपर्यंत काम बंद केले. या पाच तासात वाहन परवाना संदर्भातील कोणतेच काम न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

आरटीओतील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत घातली. त्या नंतर ते कामावर परतले. मात्र, यात नागरिकांच्या कामाचा खोळंबा झाला. लर्निंग लायसन्स (शिकाऊ परवाना) काढण्यासाठी बायोमेट्रीक नोंदणी व स्मार्ट कार्ड प्रिंटचे काम युटीएल या हेद्राबाद स्थित कंपनीला दिला आहे. त्याचे १५ कर्मचारी पुणे आरटीओ कार्यालयात काम करतात. दोन महिन्यापासूनच वेतन न मिळाल्याने त्यांनी अचानक काम बंद केले. त्याचा मोठा फटका नागरिकांना बसला. पुणे आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्स काढण्यासाठी दररोज सातशे ते आठशे नागरिक येतात. युटीएल या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी साडेसात वाजता अचानक काम बंद केले. नागरिक लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आल्यानंतर त्यांचे काम करण्यास या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे आरटीओमध्ये चांगलाच गोंधळ सुरू झाला. या वेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

हे कर्मचारी खासगी कंपनीचे आहेत. त्यांच्याशी आरटीओशी थेट संबंध नाही. तसेच ते आंदोलन करणार आहेत असे कोणतेच पत्र दिलेले नाही. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची समजूत काढण्यात आली. त्या नंतर ते पुन्हा कामावर परतले.
डॉ अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.