‘स्वच्छंद ॲडव्हेंचर’चा वर्धापनदिन उत्साहात

‘स्वच्छंद ॲडव्हेंचर’चा वर्धापनदिन उत्साहात

पुणे, ता. १० : ‘स्वच्छंद ॲडव्हेंचर फाउंडेशन’चा सातवा वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नेपाळ येथील एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक आणि हिमाचल प्रदेशमधील पाताल सू ट्रेकमध्ये सहभाग घेतलेल्या सदस्यांना या वेळी प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले.

गांधी भवन हॉलमधे पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ गिर्यारोहक अजय ढमढेरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इतर राज्यात जाऊन माऊंटेनियरींग कोर्सेस केलेल्या स्व‍च्छंदच्या सभासदांचे ढमढेरे यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. प्रतिवर्षी साजरा होणारा हा कार्यक्रम गेले दोन वर्ष कोरोनामुळे आयोजित करता आला नाही, अशी खंत संस्थेचे संचालक अनिल बोंडे यांनी या वेळी व्यक्त केली. संस्थेचे वरिष्ठ सल्लागार दिलीप टिकले, गिर्यारोहक भगवान चवले आणि हर्षद राव या वेळी उपस्थित होते.

जानेवारी २०२० ते मार्च २०२३ या कालावधीत झालेल्या कोकण किनारपट्टी ट्रेक, सातमाळा डोंगररांग ट्रेक, तसेच हिमालयातील ब्रह्मताल, बियास कुंड आणि दयाराम भुग्याल ट्रेक अशा विविध उपक्रमाविषयीची सविस्तर माहिती फाउंडेशनचे संचालक अनिकेत कुलकर्णी यांनी दिली. मे महिन्यात झालेल्या लहान मुलांच्या गिर्यारोहण प्रशिक्षण ओळख शिबिरातील सहभागी चिमुकल्यांचे सुद्धा प्रशस्तिपत्रक देऊन कौतुक करण्यात आले. तीन दिवसांच्या या निवासी शिबिरातील विविध स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुला-मुलींना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमांच्या चित्रफितींचे सादरीकरणही या वेळी केले गेले. कुलकर्णी यांनी आगामी काळातील उपक्रमांविषयी माहिती देताना भविष्यात अधिक तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक मोहीम आखण्याचा मानस व्यक्त केला. सूत्रसंचालन संवेद मठपती यांनी केले. अनिल बोंडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com