दलित पँथरचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात

दलित पँथरचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात

Published on

पुणे, ता. ११ ः दलित पँथरचा ५१ वा वर्धापन दिन सोहळा आमदार सुनील कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आदी विविध क्षेत्रातील ५१ मान्यवरांना ‘पँथर रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या भिम क्रांती मित्र मंडळ, अखिल दांडेकर पूल मित्र मंडळ आणि औंध युवा शक्ती या संस्थानाही या कार्यक्रमात गौरवण्यात आले. तसेच काही दिवसांपूर्वी सदाशिव पेठेत एका युवतीवर प्राणघातक हल्ला होत असताना तिला वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्ष पाटील या तरुणांना ‘साहसी वीर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी चळवळ अधिक तीव्र करून वंचित आणि सर्व घटकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच संजीव ओहोळ, असित गांगुर्डे, विशाखा गायकवाड, राहुल शेवाळे, निलेश आल्हाट, राम जाधव आणि दलित पँथरचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीकांत लोणारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.