‘शासन आपल्या दारी’साठी जेजुरीत जय्यत तयारी

‘शासन आपल्या दारी’साठी जेजुरीत जय्यत तयारी

पुणे, ता. ११ ः पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे येत्या गुरुवारी (ता. १३) आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची जय्यत सुरु आहे. यासाठी जेजुरीतील नवीन पालखी तळावर सुमारे नऊ एकर जागेवर मंडप उभारणीचे काम सुरु केले आहे. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाच्या निमित्ताने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. जिल्हा रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या मेळाव्यात ५ हजार २९० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजता हा रोजगार मेळावा सुरु होणार असून, यामध्ये इयत्ता पाचवी, दहावी, बारावी, पदविकाधारक, पदवीधारक, आयटीआय, बीई-बी.टेक आदी पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

दर गुरुवारी जेजुरीत आठवडी बाजार भरत असतो. परंतु येत्या गुरुवारी जेजुरीत ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन केले असल्याने या आठवड्याचा बाजार रद्द केला आहे. आता तो दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) भरविण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी व गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी कळविले आहे.

उपक्रमाविषयी....
- जेजुरीकडे येणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करणार
- अवजड वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने वळविणार
- गुरुवारी पहाटे पाच वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल
- पुणे-पंढरपूर व पुणे-बारामती मार्गावरील जड वाहनांची वाहतूक बंद
- सातारा, फलटण, बारामतीकडून पुण्याकडे जाण्यासाठी जेजुरी, सासवडकडे येणारी जड वाहतूक बंद
- ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास येणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक बदल शिथिल
- ड्रोनद्वारे चित्रीकरणासाठी पोलिस अधिक्षकांची परवानगी बंधनकारक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com