लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना 
पक्ष, संस्थांतर्फे अभिवादन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना पक्ष, संस्थांतर्फे अभिवादन

Published on

पुणे, ता. १८ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने विविध संघटना, संस्था आणि पक्षातर्फे शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे सारसबाग व काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी काँग्रेस कमिटीचे सदस्य महबूब नदाफ, महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी, अजित दरेकर, नारायणराव पाटोळे आणि भवानी पेठ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुजित यादव उपस्थित होते.

लहुजी आर्मीच्या वतीने सारसबाग येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष अंबादास सूर्यवंशी यांनी अण्णा भाऊ साठे यांनी गायलेले पोवाडे, लेखन, रचना, समाजकार्य आणि राजकारण तसेच लेखनात जातीव्यवस्था, दलित-सवर्ण संघर्ष, निसर्ग, स्थलांतरण, शहर आणि ग्रामीण जीवन यातील संघर्ष असे अनेक पैलू पाहायला मिळतात, असे येथे नमुद केले. या वेळी संघटनेचे प्रभाकर इंगळे, सुनील खुडे, परशुराम भवाळ, वसंत शिंदे, किशोर खुडे आदी उपस्थित होते. झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे सारस बागेजवळील पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी दलाचे प्रदेश अध्यक्ष भगवानराव वैराट, काशिनाथ गायवाड, सुनिता अडसुळे, वंदना पवार, सुरेखा भालेराव, मोहमंद शेख उपस्थित होते.

जैन विचार मंचातर्फे अभिवादन
भारतीय मातंग युवक संघटनेतर्फे सारसबाग येथील पुतळ्यास संघटनेचे अध्यक्ष शंकर वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी राजेंद्र भोंडवे, पांडुरंग दुबळे, सनी भोंडवे, ऋषिकेश वाघमारे उपस्थित होते. जैन विचार मंचातर्फे आयोजित कार्यक्रमात मंचाचे सचिव शंकर वाघमारे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी संघटनेचे कार्यकारणी सदस्य गौरव वाघमारे, दत्तात्रय भोंडवे, प्रथमेश वाघमारे, दत्ता महापुरे, प्रतिक कांबळे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.