किरीट सोमय्यांविरोधात कॉंग्रेस पक्षाचे आंदोलन

किरीट सोमय्यांविरोधात कॉंग्रेस पक्षाचे आंदोलन

Published on

पुणे, ता. १८ ः भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाबद्दल शहर कॉंग्रेसने किरीट सोमय्या यांचा निषेध नोंदविला आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी टिळक रस्ता येथे आंदोलन करण्यात आले.
सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध झाला. त्यानंतर पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमय्या यांच्या निषेधार्थ टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, कमल व्यवहारे, नीता राजपूत, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, अजित दरेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.